अंतर्भूत

आज एका नव्या घरात शिफ्ट झालो. सुरभी, माझी बायको! सगळ घर अगदी नीट ठेवण्यात पटाईत! जुन्या घरातून पाय अजिबात निघत नव्हता पण काही कटू आठवणींच्या विळख्यात स्वतःला बांधून ठेऊन तिथे राहणं जमलं नसतं. म्हणून इथे राहायला आलो. आयुष्याची एक नवी सुरवात म्हणून! आमच्या लग्नाला आता अवघी १७ वर्ष पूर्ण होतील. या सगळ्या काळात आमच्या वाट्याला […]

Read More अंतर्भूत

एखाद्या मुंगीकडेसुद्धा भीतीने बघणाऱ्या व्यक्तीला जर मी जंगलात नेलं तर त्या व्यक्तीची मानसिकता कशी असेल? अगदी तशीच आज माझ्या बहिणीची होती. आज तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. लहानपणापासूनच डॉक्टर हा तिचा जगातला एकमेव शत्रू! मला आजसुद्धा तिच्या लहानपणी घडलेला एक किस्सा अगदी स्पष्ट आठवतो. ६-७ वर्षाची असताना तिला कुठल्यातरी कारणामुळे इंजेक्शन द्यायची गरज होती. तेव्हा […]

Read More

चाळ

आज कामावरून घरी यायला मला थोडा उशीरच झाला होता.जेवण होऊन सगळ आवरेपर्यंत १२ वाजून गेलेले होते.माझी झोपण्याआधी बिडी ओढायची सवय अजून गेली नव्हती. मी ‘फेरफटका मारून जरा पाय मोकळे करून येतो’ अस सांगून बाहेर पडलो. आजूबाजूचे सगळे झोपलेले होते. बहुदा सगळ्यांची मध्यरात्र चालू होती. चाळीच्या खाली काही मुलं पत्ते खेळत टवाळक्या करत बसलेली होती. मी […]

Read More चाळ

बंध

उद्या आजोबा ९२ वर्षाचे होणार. पारतंत्र्य पाहिलेला हा घरचा एकमेव सदस्य! आपण ज्यांना पेन्शनर अस संबोधतो त्यातले एक आमचे आजोबा! गेल्या वर्षात फार थकले होते. त्यांच्या गुढघ्याच ऑपरेशन झाल असल्यामुळे चालणं फिरणं फार कमी झालेलं. दिवसभर वरच्या खोलीत बसून असायचे. पण दिवस अगदी सहज जायचा त्यांचा.! ते पेपर सुद्धा वरच्या टोकापासून शेवटच्या संपादकांपर्यंत सगळ इतंभुत […]

Read More बंध

खिडकी

भाग १ मी मूळचा जळगावचा.! पुण्यात नोकरीसाठी आलेलो! अगदी पेठेत जागा भाड्याने घेतली होती. एक रिटायर झालेल्या आजोबांनी मला त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या २ खोल्या रहायला दिल्या. खोलीवर जायला बाजूने जिना होता. चावी देताना त्याबरोबर लिहायला एक फळा पुरणार नाही इतकी नियमावली मला ऐकावी लागली होती. “याआधी एकदा मी एका मुलाला भाड्याने जागा दिली होती […]

Read More खिडकी

ती आणि मी

भाग १ आज आजीच्या ओळखीतून माझ्यासाठी एक स्थळ आलं आहे असं कळलं.! खरं सांगायचं तर मुळात असं ठरवून कोणाशी लग्न करायचं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती, पण बहुधा “मुलाचं सध्या बाहेर काहीही नाही” असं समजून आज मला एका मुलीला भेटायला जायचं होत! मी ठरलेल्या वेळेच्या १० मिनिटं आधी कॅफे मध्ये जाऊन बसलो, कारण आज मला […]

Read More ती आणि मी

ओळख!

सकाळची झोप हि सगळ्यांची एकदम आवडीची गोष्ट! बहुदा जगात जो माणूस “५ मिनिटे अजून झोपूदे” अस म्हणत नाही तो जगावेगळा! अश्या झोपेतून मला आज अचानक जाग आली. कोणीतरी मला जोरात हाक मारल्यासारखा वाटलं. मी आईवर जोरात ओरडून म्हंटलो, “कशाला हाक मारली इतक्या लवकर! कॉलेज ९ वाजता आहे आणि ६ला काय उठवतेस!” “मी तुला उठवण्याचा काम […]

Read More ओळख!

एक शेवटची भेट

तेव्हा बाहेर पावसाची थोडीशी रिमझिम चालू होती. मी खिडकीतून बाहेर एका शून्यात बघत होतो. मन खूप अस्थिर झालेल. काल झालेल्या एका फोनवर मी आज तडक इथे येऊन पोचलो होतो. एक माझा आधार जो आजवर मला सावरून घेत होता तोच माझ्याकडे आज निपचित पडून फक्त हसून बघत होता. त्या भयाण शांततेत एक विचित्र अशी अशांतता होती. […]

Read More एक शेवटची भेट